आजी आजोबा यांच्या गप्पा गोष्टी Aaji Ajoba Jokes in Marathi

Funny Jokes of Grand-mother and Grand-father in Marathi Language

Aaji Ajoba jokes in Marathi language

आजोबांचे वय 85 झाले होते. आजींचे वय 80 होते.

त्या दोघांच्या लक्षात आले, की आता आपली परतीची वेळ भरत आलेली आहे. दोघांनी विचार केला की आपण केलेल्या एकमेकांच्या बाबतील चुका, अपराध मान्य करू, एकमेकांना सांगू, म्हणजे मरताना रुखरुख राहणार नाही..

आजोबांनी प्रथम सांगावे असे ठरले.

आजोबांनी सांगायला सुरवात केली~

“१) तुला आठवते काय, कधी कधी तू केलेली भाजी, आमटी खूप खारट असायची, तुला खूप वाईट वाटायचे, असे कसे झाले ? असा विचार करत बसयाचीस. त्याचे कारण, मीच तुला त्रास देण्यासाठी भाजीत जास्त मीठ घालायचो..”

आजोबा आजीची प्रतिक्रिया काय होते, असे पहात असतात..

आजी न रागवता शांतपणे म्हणतात~

पुढे सांगा..”

आजोबा सांगतात~

“तू ठेवलेल्या वस्तूची जागा मी बदलायचो, त्यामुळे वस्तू शोधतांना तू त्रासून जायचीस..”

आजोबा, आजींच्या प्रतिक्रिये साठी वाट बघतात..

आजी न रागवता शांतपणे म्हणतात~

पुढे सांगा..”

आजोबा पुढे विचारतात~

“तुला आठवते का ? एकदा तुझी आई आपल्याकडे आठ दिवस राहण्यासाठी आली होती. परंतु दोन दिवसात परत गेली होती, कारण भुताची भीती दाखवून मीच तिला पळवून लावले होते..”

आजोबा आजींच्या प्रतिक्रिये साठी वाट बघतात..

आजी न रागवता शांतपणे म्हणतात~

पुढे सांगा..”

Real Suspense आता आहे

आजींच्या शांत राहण्यामुळे दमून, थकून आणि चिडून गेलेले आजोबा म्हणतात~

“आता तूच काहीतरी केलेल्या फसणुकीबद्दल सांग..”

😡😠

आजी विचारतात~

“तुम्हाला आठवते का? आपले लग्न झाल्यावर मी तुम्हाला माळ घालता क्षणी तुमची आत्या चक्कर येऊन पडली होती, आणि तिची वाचा सुध्दा गेली.

कारण मला बघायला फक्त तुमची आत्या आली होती, लग्न घाईत केल्यामुळे लग्नाअगोदर आपली भेट आत्या बरोबर होणार नाही याची मी काळजी घेतली. आत्या बघायला आली तेव्हा माझी सुंदर मावस बहिण दाखवली, आणि लग्नात वरमाला मी घातली.

म्हणून आत्याबाईला भोवळ आली व लगेच वाचा पण गेली..”

आजोबा काकुळतीला येऊन विचारतात~

तुझी मावस बहीण कुठे आहे..??

आपल्याकडे कधी का नाही बोलावले..??”

आजी सांगतात~

“तिला याची काहीही माहिती नाही. लग्न ठरल्या नंतर तिचा पत्ता कट करण्यासाठी, तिच्या बरोबर मी भांडण ‘उकरुन‘ काढले. तिने प्रतिज्ञा केली की, आपले तोंड ती, पहाणार नाही..”

😊🙃😌😊

आजोबांच्या घशाला कोरड पडली..

सौ सुनार की, एक लोहार की..

😛😜😛😜😝😆😂😂

विद्यार्थी शिक्षक विनोद

आजोबा जेव्हा आजीनी सांगितलेल्या गोष्टी विसरतो

कदाचित काही वर्षांनी या संवादात आपलाही सहभाग असू शकेल.

७५ वर्षाची आजी आणि ८० वर्षाचे आजोबा  यांच्यातला सुखद संवाद…

आजोबा : मी किचनमधे जातोय.  तुला काही आणू का?

आजी : आईस्क्रीम आणा एका कपमध्ये. लिहून घ्या, नाही तर विसराल..

आजोबा : अगं, तेवढं आठवणीत राहते बरं, तू पण ना… ..

आजी : अहो, आईस्क्रीमवर स्ट्रॉबेरी तेवढी ठेवा.

आजोबा : अगं हो नक्की .

आजी : अहो, परत सांगते लिहून घ्या, विसराल तुम्ही…

आजोबा : अगं, एवढ्यात काय विसरेन ?

आजी : आणि एक सांगू? आइस्क्रीमवर क्रीम पण टाकून आणा. आता तर लिहूनच घ्या. नक्कीच विसराल .

आजोबा : अगं, आणतो सगळं तू सांगितलं तसच, बस्…!

अर्ध्या तासांनी आजोबा डोकं खाजवत एका प्लेटमध्ये शेव नी कुरमुरे घेऊन परत आले..

आजी : बघा आता, म्हणूनच मी सांगत होते… विसरलात ना ? मी शेव कुरमुरेमध्ये बुंदी टाकून  आणा असं सांगितलं होतं, नाही ना राहीलं लक्षात ?

😘😇😂😍

HAPPY GOLDEN YEARS !

विद्यार्थी आणि शिक्षक जोक्स मराठी मध्ये

Leave a Comment