ज्योतिष नी केली भविष्यवाणी विनोदी कथा वाचा comedy jokes

Astrologer funny, comedy story in marathi.

हि कहाणी आहे एका गावातल्या ज्योतिष ची. एक दिवस सविता नावाची बाई ज्योतिष कडे तिची कुंडली घेऊन येते, त्यावेळेस कशी गम्मत होते ते या पोस्ट मध्ये वाचा.

ज्योतिषी : तुझे नाव सविता आहे ?
सविता :  होय,  महाराज !
ज्योतिषी : तुझ्या पतीचे  नाव रितेश आहे ?
सविता : (हात जोड़ते) होय…… होय….. महाराज !
ज्योतिषी : रितेश चे वय ४५ वर्षे आहे ?
सविता : होय….. होय….. होय….. महाराज !
ज्योतिषी : तुला १ मुलगा आणि १ मुलगी आहे ?
सविता : होय एकदम बरोबर  महाराज !
ज्योतिषी : मोठा मुलगा १८ वर्षाचा आणि.. नाव आहे  ऋषिकांत ?
सविता : (नतमस्तक होवून) उत्तरादाखल फक्त जोरजोरात मान हालवून होय…. होय…..
ज्योतिषी : मुलगी १५ वर्षाची आणि नाव ऐश्वर्या आहे ?
सविता : (कमरेतून वाकून – अत्यंत नम्रपणे) होय महाराज ! बिलकुल तंतोतंत सांगताय महाराज……!
ज्योतिषी : काल तू २५ किलो गहू खरेदी करून आणलेस ?
सविता : (गुढग्यावर बसून) धन्य धन्य महाराज ! तुम्ही तर साक्षात्  अंतर्यामी आहात …..!
ज्योतिषी : परत येशील तेव्हा कुंडली घेऊन ये रेशन कार्ड नको, समजल का ????

😂😂😂

puneri jokes

Leave a Comment