If you want to read jokes on doctor patient, then you have to the right place. Here are doctor patient funny jokes, memes, funny whatsapp messages, funny conversations between a doctor and patient.
Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता . लांबून एक इसम लंगडत येताना दिसला.
एक डॉक्टर म्हणाले ” याला काय झालं असेल हो ?
” डॉक्टर १ :left knee arthritis .”
डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis “.
डॉक्टर ३ :” काहीतरीच काय! Ankle sprain असणार .”
डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार .”
डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय .
डॉक्टर ६………….काही बोलणार…. तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला , . . . .
इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय????? 🤣🤣🤣
महिला :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय…
.
डॉक्टर :- मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल
.
.महिला :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
.
सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??
🤣🤣
ऑस्ट्रेलिया हा एक महागडा देश आहे परंतु सर्व सुविधा वेगवान आहेत. 👇👇👇
मागच्या वर्षीच्या नाताळ च्या सुट्ट्यांमध्ये कोल्हापूर मधील एक कुटुंबाने ऑस्ट्रेलिया गाठले ,…
पती, पत्नी, दोन मुले आणि वडील यांच्यासह गेला.
त्यांच्या मागे एक एक कार येत होती…. अचानक ऑस्ट्रेलियन महिलेने पाहिले की काकांनी कारच्या खिडकीतून डोकावून रक्ताची उलटी केली. …😰😰😰
लगेच त्या बाईने सेवा केली आणि आपत्कालीन सेवा,
ताबडतोब एअर रुग्णवाहिका, हेलिकॉप्टर आले व काकाना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले. संपूर्ण स्टाफ काका मागे धाऊ लागला. एक तासांनी काका safe असल्याचे कळाले, त्या महिलेचे आभार मानले, तेवढ्यात हॉस्पिटल चे 3500 ऑस्ट्रेलियन डॉलर(सुमारे 1 लाख 90 हजार) चे बिल मुलाच्या हातात आले……..
मुलगा ओरडुन म्हणाला,, “बाबा काय गरज होती मावा खाऊन खिडकीतून पिचकारी मारण्याची ??“
😝😝😄😄🤩🤩
Funny Doctor jokes in Marathi
शिंक किंवा खोकला आला कि असं वाटतं
.
.
.
देवानं आपली फाईल हातात घेतली कि काय?
🤪🤪🤪🤦♂️🤪🤪🤪🤔
डॉक्टर:- मॅडम तुमच्या पती चे कोरोना टेस्ट निगेटिव्ह आले आहे.
पत्नी:- त्यांचे काही सांगू नका हो,
तो माणुसच निगेटिव्ह आहे.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
आजींनी हॉस्पिटल मध्ये फोन केला आणि म्हणाल्या:
“मला रूम नंबर 302 मधल्या निर्मला नेने यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का..
जरा काळजी वाटतीये म्हणून फोन केला..”
“जरा दोन मिनिटं होल्ड करा हं” असं म्हणत तिथल्या ऑपरेटर नी तिसऱ्या मजल्यावरच्या नर्सशी फोन जोडून दिला.
नर्स म्हणाली – बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात. डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.
“वा वा! खूप बरं वाटलं ऐकून ! धन्यवाद!”
आजी म्हणाल्या.
नर्स : तुम्ही त्यांची बहीण बोलताय का?
नाही, मी स्वतः निर्मला नेने बोलतीये 302 मधून !
मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हणलं स्वतःच चौकशी करावी !!
आत्मनिर्भर आजी….
🤦♂️
हि गोष्ट आहे एका दवाखान्यातील.
एक रुग्ण एका शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात येतो आणि काही वेळानंतर तो रुग्ण तेथून पाळायला लागतो.
डॉक्टर पण त्याच्या मागे पळत जातो.
एका माणसांनी त्या डॉक्टर ला विचारले कि “काय झाले, तुम्ही या माणसा च्या मागे का पळत आहात.“
तर डॉक्टर म्हणतो कि “हा माणूस प्रत्येक वेळेस माझ्या कडे डोक्यावर शास्त्र क्रिया करण्यासाठी येतो आणि केस कापून झाले कि पळून जातो.“
😂😂😂🤣🤣🤣
डॉक्टर: आता कस वाटत आहे तुम्हाला?
पेशंट: तुम्ही दिलेली औषधी चांगली आहे. ताप आता कमी आहे पण जीव घाबरल्या सारखं वाटत आहे.
डॉक्टर: चिंता नको करू, ते पण चालले जाईल.
🤣🤣🤣
एक दिवस पिंट्या डॉक्टर ची मजा घ्यायला दवाखान्यात जातो.
तो डॉक्टर ला विचारतो : तुम्हाला टाके घालता येतात का?
डॉक्टर : हो येतात कि, कशाला घालायच्ये आहेत?
पिंट्या: हे बघा चप्पल. याचा बटन तुटला आहे, जरा ठीक करून द्या बर.