घरा घरांचा पसारा Ghar ghar cha pasara jokes in Marathi

पसारा

शेजारणीने आवाज दिला म्हणून 

बायको कुकर लावून शेजारी गेली

म्हणाली ३ शिट्या झाल्या की बंद करा गॅस

वर टाकीत ही पाणी भरतंय, लक्ष असू द्या

मोटर बंद करा वेळेत

मी म्हटलं हो ..

आता सुरू होते real struggle

इतक्यात नळाला पाणी आलं

लगेच धावत जाऊन 

बादली नळा खाली धरली

धावताना शेंगदाण्याचा डबा उपडी झाला

शेंगदाणे जमा करीतच होतो

इतक्यात कुकरची पहिली शिटी झाली

अचानक झाली त्यामुळे दचकलोच

झटकन मागे गेल्यामुळे 

दळून आणलेल्या पिठाची पिशवी कलंडली

आणि त्या सांडलेल्या पीठात 

कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, भाज्या

गोऱ्यापान झाल्या

काय करावं ? सुचेना 

परत नळा खाली भरत असलेल्या 

बादलीची आठवण झाली 

लगबगीने बादलीकडे गेलो

अजून बादली भरली नव्हती

पुन्हा शिटी झाली … पटकन गॅस बंद केला

नंतर लक्षात आलं …  दुसरीच शिटी होती ती

लाईटरने गॅस पेटवायला भीती वाटते 

मग माचीस घेतली

१, २, ३ श्या ! माचीस काड्या फुकट गेल्या

.. मग काय आधी कंटाळा केला ते केलं

पंखा बंद केला … गॅस पेटवला

आता सांडलेले पीठ उचलू, 

की पसरलेले शेंगदाणे भरू

बादली भरत आली ते पाहू

की वर पाण्याची टाकी किती भरली ते पाहू

 …. मी हैराण …काय करावं ? सुचेना 

आवाजा वरून लक्षात आलं

पाणी वाहून जातंय 

बादली भरून सांडत होती

भरलेली बादली काढून दुसरी लावतोय

तोच तिसरी शिटी झाली 

तसं धावत येऊन पंखा लावला

मनात म्हटलं माझं डोकं फिरलंय नक्कीच

सगळं सोडून आधी गॅस काढला

इतक्यात पाणी वाहून जातंय असा आवाज

वरची टाकी ओव्हर फ्लो … मोटर बंद केली

पण या नादात पंखा जरा उशिराच बंद केला

वाऱ्याने पीठ चांगलंच पसरलं, 

त्यात माझे ओले पाय … लादी चिकट

व्हायचा तो पसारा झालाच 

आता बायको ओरडणार, 

हे मनात आलं तोवर 

बायको ची entry

बायको ही आलीच दारात

काय करावं ? सुचेना 

झाला पसारा पाहून 

आता ही मला झापणार 

म्हणेल काय हो, किती हा पसारा ?

पण ती मात्र एकच म्हणाली

अहो, तुम्ही या बाहेर 

मी आवरते सगळं

तुम्ही तुमचं काम करा

एक टप्पा बॉल सारखा

मी तडक किचन मधून हॉल मध्ये 

पण ह्या उडीत ही

ओट्यावरची तेलाची बाटली कलंडलीच

मी पुन्हा किचनमध्ये प्रवेश करणार तोच

बायको पुन्हा त्याच स्वरात 

राहू दे मी आवरते

मी सोफ्यावर शांत … चिडीचूप

काय करणार ..?

पसारा का होतो याचे उत्तर मिळाले होते ना

(किती तो पसारा असं बायकोला कितीतरी वेळा ठणकावून विचारून नवरेशाही गाजवणाऱ्या त्या सर्व नवरोबांसाठी) 🤣🤣

आजी आजोबा यांच्या गप्पा गोष्टी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version