पुण्यातील हसवून टाकणारी हि गोष्ट वाचाच

हि गोष्ट आहे पुणे ची, दुपारचे २ वाजले होते

एक मुंबई चा माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहिही अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच.
त्या दरवाजा वर “टणक    ऊस” ??? असं एलीहून ठेवले होते
हे नाव का बर ठेवले असेल, असे तो माणूस विचार करू लागला.
त्याच्या मनात खूप जास्त उत्सुकता निर्माण झाली होती आणि हे उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. खूप विचार केल्यानंतर त्याने बेल मारली.

त्या घरातून एक म्हातारा बाहेर आला आणि त्या माणसाला तो प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“कायय् ?” म्हातारा बोलला .
“अहो ते… या बंगल्याचे नाव
टणक    ऊस” का ठेवलय ?” असे तो माणूस बोलला
म्हातारा विस्कटलाच… “हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? भामटेगिरी आहे ही” तो म्हतारा खूप चिडला होता आणि खूप रंगात होता.
” साँरी… पण आता झालीच आहे झोपमोड तर सांगा  ना “टणक    ऊस” काय प्रकार आहे?”  चाचरत त्या  माणसाने विचारलं…
“निर्लज्ज आहात तुम्ही”
“ते झालंच पण “टणक    ऊस”….
“अहोssss…” म्हातारा फिस्करला
“अक्षर जुनी झाली की तुटून पडतात….. सगळ्यांना माहिती आहे हे ‘पाटणकर हाऊस‘ आहे….

😂हसत रहा …. स्वस्थ रहा 🤣

Marathi Jokes

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version