विद्यार्थी शिक्षक जोक्स Vidyarthi Shikshak Jokes in Marathi

Vidyarthi shikshak jokes in Marathi

शाळेत नवीन आलेल्या वर्गशिक्षकांनी मुलांना विचारलं,
“शाळा सुटल्यावर तुम्ही काय करता?”
एक मुलगा म्हणाला,
“मी नारायण भंडारी च्या घरी जाऊन पप्पासाठी भांगेची गोळी घेऊन येतो.”
दुसरा मुलगा म्हणाला,
“मी नारायण भंडारी च्या घरी जाऊन बापासाठी हातभट्टीचा खंबा घेऊन येतो.”
तिसरा मुलगा म्हणाला,
“मी नारायण भंडारी च्या घरी जाऊन आमच्या बाबांच्या चिलमीत गांजा भरून येतो.”
चौथा मुलगा म्हणाला,
मी घरी जातो. हातपाय धुवून थोडं खातो. *देवाजवळ दिवाबत्ती करून प्रार्थना,स्तोत्रं म्हणतो आणि अभ्यासाला बसण्याच्या आधी आईवडिलांना त्यांच्या कामात मदत करतो
शिक्षक म्हणाले,
शाब्बास…..
या वर्गात मॉनिटर व्हायला तूच एक लायक मुलगा दिसतोस मला.
चल “मॉनिटर बॅज” लावतो तुझ्या छातीवर.
नाव काय तुझं?
मुलगा म्हणाला,
नारायण भंडारी …! ……….. 🤭🙂🙃😌😎

Back Benchers
मी शाळेत असताना इतका सुंदर होतो की मला मॅडम म्हणायच्या…
तिथून उठ अन माझ्यासमोर येऊन बस. 😂😂

Daaru vr jokes

(Zoom App वरचा एक क्लास )
शिक्षक : तर मुलांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय संपवलं होतं…?
विद्यार्थी : आमचा डेटा सर…
🎭…

Zoom app jokes in Marathi, online classes jokes

शाळा सुरु झाल्यावर मास्टरची नवीन डोके दुःखी…
सर, ह्याने माझा मास्क काढला..
.
सर, हा माझ्या मस्कला हात लावतोय..
.
सर, हा माझ्यासमोर शिंकला…
.
सर, याने माझा मास्क फाडला…
.
सर, मी माझा मास्क धुवून आणू का…?
.
सर :- ह्याने माझे सॅनिटायजेर सांडले..
.
सर, कोणीतरी माझे सॅनिटायझर चोरले

आईने मुलाला विचारलं आज होमवर्क काय आलायं तर तो म्हणाला.. मला नाही आला,
मी मॅडमला ब्लॉक केलंय! 🤭
ऑनलाइन शिक्षण 😁😜

Breaking News,,,,
विद्यार्थ्याला Online झापड मारताना सरांचा laptop तुटला…

टक्केवारी कमी पडली म्हणून नाराज होऊ नका, 44 54 56 वाल्यांनी 105 घरी बसवलेत.

आजकाल मुलांना मार्क्स फैरेनहाईटस् मधे मिळतात.. 96.7, 98.4, 99.3 आम्हांला सेल्सियसमधे मिळायचे… 36.5, 40.5, 44.8 

आज बसस्टॉपवर गणिताचे दीक्षित सर भेटले, त्यांच्या पाया पडून तब्येतीची चौकशी केली,
निघताना मोबाईल नंबर मागितला, सरांनी नंबर दिला,
नऊ अब्ज बेचाळीस कोटी एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे एकोणचाळीस.
मी पुन्हा मागणार होतो पण नको म्हणलं, काय करायचाय.
😜🤣😂😂😂

शिक्षक : पिंटू, बुर्ज खलिफा कुठे आहे?
पिंटू : मला माहित नाही, सर.
शिक्षक (रागावून) : बाकावर ऊभा राहा.
पिंटू (बाकावर ऊभा राहून) : तरी पण दिसत नाही आहे, सर.
🤣🤣🤣

Teacher: तुमचा मुलगा 1 ते 100 पर्यंत अंक म्हणताना 45 नंतर Direct 66 म्हणतो.
मुलाची आई: मी मुलाला खुप वेळा समजावले की 45 नंतर 46 येतात…. पण जेव्हा आपण शिकवीत होत्या तेव्हा मध्येच 45 च्या वेळेस Network गेले होते, आणि  66 च्या वेळेस Network आले ……
आता तो म्हणतो की मॅडम ने असेच शिकवले
🤦‍♂️🤦‍♂️😅😅

Online अभ्यास 😅
मुलगा : पप्पा माझा रिजल्ट आला आहे..
पप्पा : बघू बघू…
मुलगा : दाखवतो…पण रिजल्ट पाहिल्यावर सोशल डिस्टन्स ठेवायच बर का…
😂😂😂

कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही – न्युटन 🤓 पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो – सरकारी न्युटन 😎 😜😝😛 कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात. – न्युटन चा चुलत भाऊ. U टन 😂😂😂😜😜 कैप्सूल खाऊन बनवलेली बॉडी , जमीन विकून आलेला पैसा , फेसबुक वर झालेल प्रेम आणि व्हाट्सएप्प वर मिळवलेले ज्ञान … कधीच टिकत नाही – न्युटन चा काका . राईट टन . 😉😉 😂😂😂😂😂😂😂😂😂 . . . जर सकाळी लवकर उठल्याने ताक़त, बुद्धि आणि धन वाढत – तर पेपर वाला आणि दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते । . झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या ।😀😀 – न्युटन ची चुलत बहीण . स्वीटन 😜😜🤑😛🤑😤😵🤔😬🤔😛😛🤑 😆😆😆😆😆😆🤑 परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक… “काट्याने” खातात, तर भारतीय नवरे…? “मु काट्याने” – न्युटन ची काकू . क्यूटन 😁😬😟😖 Enjoyed.. V good 👌

शिक्षक :  मुलांना उद्या वर्गात येताना  कोरोना  वर निंबध लिहून आणा..
बंड्या : सर मी करोनावर  निंबध लिहिलि आहे : 

कोरोना

    कोरोना हा  एक  नवीन सण असून तो २०२० सालापासून  सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा  एक मोठा सण आहे.  होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो.  चीनने या सणाची सुरुवात केली असली तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा  करतात . तसेच हा एकमेव असा सण आहे जो हिंदु, मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध अश्या सर्वां धर्मांतील तसेच श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.

ह्या सणात खूप सारे खाण्याचे फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून घरात आनंदाने राहतात.  शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते . दुकाने, आॅफिस सर्व बंद असतात.  टिव्हीवर कार्यक्रम पहायला मिळतात. सर्व  जण मिळून  हा सण साजरा करतात. या सणात तोंडाला मास्क लावून आणि एकमेकांपासून लांब अंतर ठेवून हा सण साजरा करतात.

या सणात पुरुष मंडळी दिवसभर बर्मुडा आणि टी शर्ट घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त स्वयंपाक करतात अन् मोबाईल बघत बसतात. पण हा सण बाहेर रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो हॉस्पिटल मध्ये एकट्याने साजरा करावा लागतो. व काळजी नाही घेतली तर देवाच्या घरी जावे लागते… असा हा करोना सण

🤑🤑🤑🤑🤑🤑😷😷👍👍

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version